वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

No Urgent Message from pay unit
  कर्मचारी नोंद बदल ....

Path = Worklist > Payroll > Change Details

वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती,इ.कारणांमुळे कर्मचाऱ्याच्या वेतनात व इतर नोंदींमध्ये बदल करावा लागतो. महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लग्नानंतर नाव बदलते. हे बदल करताना या tab चा उपयोग होतो. जवळपास सर्व प्रकारच्या नोंदींमध्ये बदल करता येतात. मात्र केलेल्या बदलांना वेतन पथकाकडून मंजुरी घ्यावी लागते.

या पाथ ने गेल्यावर प्रथम ज्या कर्मचाऱ्याच्या नावात बदल करायचा आहे, त्याचे नाव टाकून search करा. सुरवातीला कर्मचाऱ्यांची नोंद करण्यासाठी भरलेला पाच हेड असलेला फॉर्म ओपन होईल. यामध्ये Employee Details, Institution Details, DCPS/Bank Details, GIS, DCPS Nominee Details, Photo Signature या सर्व माहितीबद्दल कर्मचारी नोंद या tab मध्ये अधिक विस्ताराने सांगितले आहे. येथे या फॉर्म वर योग्य ती दुरुस्ती करून त्याखाली Authority Letter No. आणि date च्या ठिकाणी शाळेच्या जावक क्रमांकाची नोंद करा.व शेवटी Save and Forward या बटन वर क्लिक करा. त्यानंतर वेतन पथकाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करा. मंजुरी घ्या.

Change Details या tab मधून काही गोष्टी बदलता येत नाहीत. कर्मचाऱ्याच्या वडिलांचे नाव, कर्मचाऱ्याची जन्मदिनांक, नियुक्ती दिनांक, शैक्षणिक पात्रता,पत्ता, मोबाईल नंबर हे बदलता येत नाहीत. (यापैकी मोबाईल नंबर बदलायचा असल्यास update aadhar & u-dise या tab वरून बदलू शकता.)

शिक्षणसेवक कालावधी संपून सहाय्यक शिक्षक म्हणून नोंद करताना -

शिक्षणसेवक कालावधी संपून सहाय्यक शिक्षक म्हणून नोंद करताना Employee Details या tab मध्ये 100% Aided? = Y/N येथे yes ला क्लिक करा. व त्याखाली DCPS Applicable Date डीसीपीएस लागू दिनांकाची नोंद करा. तसेच date of entry in regular pay scale च्या ठिकाणी सहा.शिक्षक नियुक्तीची तारीख टाका.
Institution Details या tab मध्ये pay comission = 6th pay comission निवडा, मूळ वेतन बदला, individual order number date ची माहिती भरा. मान्यता प्रत अपलोड करा. मान्यता प्रत अपलोड करताना शक्यतो image file PDF formate मध्ये change करून अपलोड करा.
bank /dcps details या tab मध्ये whether dcps applicable = yes व dcps a/c maintained by pvt aided secondary school हा option निवडा.
त्यापुढे dcps nominee details ची माहिती भरा.
   
   

WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )

differance bill

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

Free Web Hosting