वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

No Urgent Message from pay unit
  नियमित वेतन देयक ....

वेतन देयक तयार करण्यापूर्वी मागील महिन्याचे देयक मंजूर होऊन त्याला व्हाऊचर नंबर पडला आहे की नाही, त्याची खात्री करा. payroll > view/delete bill या tab वर जाऊन ते पाहता येते. मागील बिलाचा महिना वर्ष निवडल्यावर बिल दिसू लागते, बिलाच्या समोर status tab खाली बिल forwarded / consolidated की approved आहे ते पाहता येते. बिल approved असेल तर पुढील माहिती भरायला लागा.

बिलामध्ये deduction च्या रकमा टाकण्यापूर्वी खालील गोष्टी चेक करा.

मागील बिलात काही कर्मचाऱ्यांचे फरकाचे बिल bill group बदलून काढले आहे का? असल्यास त्यास पुन्हा नियमित बिलाच्या bill group ला attach करून घ्या. कसे करायचे याची माहिती येथे आहे.-लिंक
मागील बिलात ठराविक कर्मचाऱ्यांच्या allowanches and deduction मध्ये बदल केला होता का? केला असल्यास employee eligibility for allowances and deduction या tab वर जाऊन बदल पूर्ववत करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - लिंक
मागील बिलात वेतन फरकाचे बिल add करून काढले असल्यास बिल कसे काढले होते , त्यानुसार बदल करा. म्हणजे बिलात basic arrears या tab मधून काढले होते की , broken period चा वापर केला होता, ते पहा.
DCPS कर्मचारी यांची नियमित dcps कपात व delayed ची कपात यांच्या नोंदी शाळास्तरावर ठेवलेल्या रजिस्टर नुसार चेक करा. dcps delayed च्या नोंदी कशा करायच्या याची माहिती येथे दिली आहे. -पहा
शिक्षणसेवक कालावधी संपून कर्मचारी नियमित सेवेत केव्हापासून येतो, याच्या नोंदी ठेवा. नियमित सेवेच्या नोंदी शालार्थ मध्ये कशा करायच्या त्याची माहिती येथे आहे.
कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी शेवटचे ३ महिने त्याचे भविष्य निर्वाह निधी वर्गणी बंद करतो. याची नोंद करण्यासाठी deduction या tab वरून GPF GRP ABC/D चेक बॉक्स deactivate करा.
कालबद्ध पदोनत्ती, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, इ. मुळे वेतनातील बदल असल्यास change details या tab वरून दुरुस्ती करा , forward करा. व वेतन पथकाकडून त्याची मंजुरी घ्या. बदल कसे करावे माहिती येथे आहे.

आता वरील सर्व बदल झाले असतील तर बिलातील कपातीच्या रकमा टाकण्यासाठी worklist >payroll>employee informaton> non government या tab ला क्लिक करा. येथे देयकाचा महिना वर्ष बिल ग्रुप निवडल्यावर खालीलप्रमाणे deduction head दिसू लागतील. यामध्ये ज्यामध्ये बदल करायचा आहे तो option निवडा . उदा.LIC, Society,RD, etc. option ला क्लिक केल्यावर मागील महिन्यातील भरलेल्या रकमा त्या कर्मचाऱ्यांच्या नावासमोर दिसू लागतील. येथे new entry या tab मध्ये चालू महिन्याच्या रकमा टाकून page सेव्ह करा. अशा प्रकारे बिलामध्ये करावयाच्या सर्व नोंदी झाल्या असतील तर बिल जनरेट करण्यासाठी worklist >payroll>view /generate bill या tab ला क्लिक करा. येथे चालू महिना वर्ष - बिल ग्रुप व बिल suplimentary की regular निवडून generate bill या tab ला क्लिक करा. bill successfully generated असा मेसेज येईल. जनरेट झालेले बिल पाहण्यासाठी किंवा प्रिंट काढण्यासाठी reports या tab वर all reports या बटण ला क्लिक करा. पुन्हा महिना वर्ष - बिल ग्रुप निवडा ok ला क्लिक करा. report च्या सर्व प्रती दिसू लागतील. एक एक page ओपन करा. व प्रिंट करा.

वेतन देयकासोबत जोडावयाची प्रपत्रे व त्यांचा क्रम याची माहिती येथे दिली आहे. लिंक

   

WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )

differance bill

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

Free Web Hosting