वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

शालार्थ वेबसाईटला भेट देण्यासाठी हेड बॅनरवर "शालार्थ" नावावर क्लिक करा K-C ग्रुप साईट वर जाण्यासाठी लोगो वर क्लिक करा तसेच होमपेज वर येण्यासाठी बटनावर क्लिक करा.
शालार्थ वेतन प्रणाली बाबत थोडक्यात ....

शालार्थ प्रणाली ही महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यक्षेत्रे यांच्या वेतनासंबंधी एकीकृत व वित्तीय प्रबंधन प्रणाली (intigrated financial management system) अंतर्गत Tata Consultancy Services च्या सहाय्याने विकसित केलेली यंत्रणा आहे. "सर्व कर्मचारी व त्यांच्या वेतनाचा एक सामायिक डेटाबेस असावा " हा यामागील महत्वाचा हेतू ... सेवार्थ वेतन प्रणाली च्या यशानंतर शालार्थ चा विकास झाला.येथे शालार्थ प्रणाली बाबत चे सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. छोट्या छोट्या गोष्टी अधिक विस्ताराने मांडण्यात आले आहेत.

शालार्थ प्रणाली अस्तित्वात येण्यापूर्वी खाजगी अनुदानित /अंशतः अनुदानित /प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने संबंधित शाळेचे दरमहाचे वेतन देयके नमुना क्र.२ व नमुना क्र २अ मध्ये तयार करून वेतन पथकाकडे सादर करण्यात येत होते. आता मात्र शालार्थ प्रणालीतून संबंधित वेतन देयके तयार होतात. वेतन पथकामार्फत वेतन देयकाची छाननी करून एकत्रित यादी तयार करून यादीच्या गोषवाऱ्यानुसार नमुना क्र.MTR-44 (Grant in Aid) मध्ये एकत्रित देयके तयार करून कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात येते. कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या एकत्रित देयकांची बँक निहाय धनादेश अथवा EFT कोषागार कार्यालयाकडून वेतन पथक कार्यालयाला प्राप्त होतात. सदर धनादेश अधीक्षक वेतन पथक यांच्या चालू खात्यावर जमा करण्यात येते.वेतन पथक यांच्या कार्लायाकडून शाळांच्या याद्या व देयकाच्या दोन प्रती निवडलेल्या बँकांच्या मुख्य शाखेत जमा करण्यात येतात. बँकेच्या मुख्य शाखेकडून पाठविण्यात आलेल्या अड्व्हाईस नुसार व शाळांच्या देयाकानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम प्रथम संयुक्त खात्यावर जमा करून घेऊन त्यामधून अशासकीय वजाती कपात करून कर्मचाऱ्याच्या वेतनाची रक्कम त्यांच्या संबंधित खात्यांत जमा करण्यात येते.

शालार्थ ची कार्यप्रणाली ही जि.प. प्राथमिक शाळांसाठी पाच स्तरांवर नियंत्रित होते,परंतु माध्यमिक शाळा , ज्युनि. व सिनी. कॉलेज, खा.प्राथ.शाळा यांचेसाठी तीन स्तर आहेत, ते पुढीलप्रमाणे -

यामध्ये DDO1 - संबंधित शाळेचा मुख्याध्यापक ,DDO2 - जिल्हा वेतन पथक, DDO3-उप संचालक कार्यालय .... शालार्थ प्रणाली मध्ये भरलेली माहिती ही वरील तीन टप्प्यांवरून मंजुरी दिली जाते. यापलीकडे system मधील दुरुस्ती कंपनी स्तरावर होते. या संबंधित दुरुस्त्यांसाठी प्रत्येक स्तरावर report issue हा tab ठेवला आहे. शालार्थ मध्ये शाळास्तरावरील केलेल्या बदलांची बहुतांशी मंजुरी ही वेतन पथक स्तरावरच होते.

WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )

 

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

कणकवली क्लार्क ग्रुप होम पेज शालार्थ वेबसाईट
Free Web Hosting