शालार्थ प्रणालीत नवीन कर्मचारी नोंद करताना प्रथम संचमान्यतेनुसार योग्य ती पदांची संख्या सिस्टीम मध्ये टाकलेली आहे की नाही याची खात्री करा. त्यासाठी रिपोर्ट या टॅबमध्ये statestical reports या tab मध्ये सामाविष्ट पदांची संख्या तपासावी. attach /detach employee to bill group या step वर सुद्धा attach vacant post मध्ये post ची नोंद आहे किंवा नाही हे समजते.
नवीन कर्मचाऱ्याची माहिती भरण्यापुर्वी पे युनिट कडून दिलेला फॉर्म सदर कर्मचाऱ्याकडून भरुन घ्या. फॉर्मवरील फोटो व सही वेगवेगळी स्कॅन करुन इमेज फाईल सेव्ह करुन ठेवावी. त्याचबरोबर कर्मचाऱ्याची मान्यता प्रतही स्कॅन करुन घ्या.
त्यानंतर खालील पाथने फॉर्म ओपन करा.
PATH = Worklist>Payroll > Employee Configuration Form ForShalarath > New employee Form

Employee Details हा फॉर्म भरताना Full Name in Devnagari याटॅबमध्ये नाव मराठीतून टाईप करावे लागते. यासाठी कॉम्प्युटरला युनिकोड फॉंट इंस्टॉल असेल तर येथे टाईप करता येईल, आणि नसल्यास येथे क्लिक करा. येथे या बॉक्समध्ये टाईप केलेले माऊस कर्सर ड्रॅगकरुन copy करा. व जेथे वापरायचा आहे तेथे paste करा.
येथे Date of joining कॉलमच्याखाली 100% Aided हा एक कॉलम दिसतो. येथे जर नवीन शिक्षणसेवक नियुक्ती असेल तर No या ऑप्श्नला click करा.जर शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झालेला कर्मचारी असेल तर येथे yes ला click करा. yes ला क्लिक केल्यास DCPS Nominee Details हा टॅब activate होतो.
या फार्ममध्ये Date of Joining टाकताना नियुक्तीची तारीख टाका. शिक्षणसेवकाच्या बाबतीत जर तीन वर्षांचा कालावधी संपून नियमीत सेवेत येत असतील अशा वेळी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीचा दिनांक येथे टाका.
पुढील institution details tab मधील माहितीसाठी पुढे बटनला क्लिक करा.
 |