वेतन फरक बील वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात.
१) नियमित देयकात basic arrears tab चा वापर करून २) broken period मधून काढणे ३) वेगळ्या bill group ला नाव attach करून seperate बील काढणे. यातील प्रत्येकाबाबत माहिती घेऊया .
१) नियमित देयकामध्ये basic arrears tab मध्ये अशी बिले समाविष्ट करायला सांगतात जी बिले एकरकमी असतात , म्हणजे ज्यामध्ये allowances deductions च्या रकमा नसतात. उदा. वैद्यकीय देयके. हे बील तयार करताना employee eligibility for allowances and deductions या tab वरून allowances सदराखाली basic arrears हा tab activate करून घ्या.
नंतर worklist > payroll > employee infromation > non computational dues and deduction या पाथ ने जा.

येथे type of component मध्ये allowances निवडा. पुढे select pay item या बॉक्स मध्ये basic arrears सिलेक्ट करा. त्यापुढे कर्मचारी ज्या बील ग्रुप ला attach आहे, तो बील ग्रुप निवडा. त्या बील ग्रुप ला असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नावे दिसू लागतील. नावाच्या समोर new amount या बॉक्स मध्ये फरकाची रक्कम टाका. सेव्ह करा.
पुढील माहितीसाठी येथे क्लिक करा...
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |