Path : Worklist > Payroll > Employee Information > Release of Annual Increment
Add new order वर क्लीक करा. पुढील window ओपन होईल.

यामध्ये increment certificate order no, date येथे वेतनवाढ आदेशासाठी आपल्या शाळेचा जावक नंबर व दिनांक टाका. Bill name मध्ये तुमचा बील ग्रुप आय डी सिलेक्ट करा. Pay commission च्या ठिकाणी सहावा वेतन आयोग निवडा. व Go ला क्लीक करा.
ज्या कर्मचाऱ्यांना increment दयायची आहे त्यांना त्यांच्या नावासमोर असलेल्या चेकबॉक्स ला क्लीक करा. व add to list टॅबला क्लीक करुन त्यांना उजव्या बाजूला आणा. चुकीने एखादा कर्मचारी उजव्या बाजूला आल्यास त्याला remove टॅबने पुन्हा वगळू शकतो.

येथे एक कर्मचारी Add केलेला आहे. त्याच्या समोर WEF date (with effect from date) हा कॉलम default 1/7/2017 असा येतो. नियमीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण येथे कोणतीही दुरुस्ती करणार नाही आहोत.
जर एखाद्या कर्मचाऱ्याला नियमीत वेतनवाढ उशीराने द्यायची असेल. म्हणजे कर्मचारी जर वेतनवढीच्या दिवशी दिर्घकालीन रजेवर असेल. यामध्ये प्रसुतीकालीन रजा, दिर्घकाळ चालणारा आजार, इ.कारणांचा सामावेश करता येईल. अशा परिस्थितीत सदर कर्मचाऱ्याला नियमीत वेतवाढ इतर सर्व कर्मचाऱ्यांबरोबर देता येत नाही. त्याला या पायरीवर Add to list करु नका. नियमानुसार तो कर्मचारी ज्या दिवशी कामावर उपस्थित होईल, त्या दिवशी त्याला वेतनवाढ देता येईल.ही वेतनवाढ देताना हे वर सांगितलेले WEF date व Remark हे कॉलम महत्वाचे आहेत. WEF date कॉलममध्ये तो केव्हा हजर झाला ती तारीख लिहा. व त्यापुढे Remark मध्ये दिर्घकालिन रजेचे कारण नमुद करा, म्हणजे झाले. हे कारण युनिकोड फॉन्ट मधून मराठीतूनही लिहू शकता.
वरील सर्व बदल झाल्यानंतर save बटनवर क्लीक करा. भरलेल्या माहितीची ऑर्डर सेव झाली की ती वरच्या बाजूला लीस्ट बार मध्ये दिसू लागेल.
सेव्ह झालेली ऑर्डर त्याचासमोर असलेल्या print report बटनाला click करून प्रिंट काढा . प्रिंट वर headmaster सही घेऊन pay unit कडून मंजुरी घ्या.
आणि एक महत्वाचे , increment order काळजीपूर्वक जनरेट करा. एकदा जनरेट केलेल्या ऑर्डर मध्ये दुरुस्ती करता येत नाही. किंवा ऑर्डर डिलीट करता येत नाही. चुकीने असे झालेच तर वेतन पथकाकडून ऑर्डर रिजेक्ट करून घ्या. पुन्हा नवीन ऑर्डर तयार करा. मात्र अगोदर तयार केलेली ऑर्डर वरच्या बाजूला रिजेक्टेड ऑर्डर म्हणून तशीच राहते , डिलीट होत नाही.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या वेतनश्रेणीचा कमाल टप्पा ओलंडत असेल, अशांच्या बाबतीत system वेतनवाढ देताना त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतन टप्प्यावरच ठेवते, म्हणजे त्यांच्या पगारात वेतनवाढीनुसार अपेक्षित बदल होणार नाहीत.
तसेच प्रतिवर्षाप्रमाणे वेतनवाढ प्रमाणपत्र या वेतनदेयकासोबत सादर करावयाचे आहे. हे प्रमाणपत्र हिरव्या पेपरवर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले व मुख्याध्यापकांच्या बाबतीत संस्थाप्रमुखांनी प्रमाणित केलेले असावे.
 |