|
वेतन देयक तयार करण्यापूर्वी मागील महिन्याचे देयक मंजूर होऊन त्याला व्हाऊचर नंबर पडला आहे की नाही, त्याची खात्री करा. payroll > view/delete bill या tab वर जाऊन ते पाहता येते. मागील बिलाचा महिना वर्ष निवडल्यावर बिल दिसू लागते, बिलाच्या समोर status tab खाली बिल forwarded / consolidated की approved आहे ते पाहता येते. बिल approved असेल तर पुढील माहिती भरायला लागा.
बिलामध्ये deduction च्या रकमा टाकण्यापूर्वी खालील गोष्टी चेक करा. |
 |
मागील बिलात काही कर्मचाऱ्यांचे फरकाचे बिल bill group बदलून काढले आहे का? असल्यास त्यास पुन्हा नियमित बिलाच्या bill group ला attach करून घ्या. कसे करायचे याची माहिती येथे आहे.-लिंक |
 |
मागील बिलात ठराविक कर्मचाऱ्यांच्या allowanches and deduction मध्ये बदल केला होता का? केला असल्यास employee eligibility for allowances and deduction या tab वर जाऊन बदल पूर्ववत करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - लिंक |
 |
मागील बिलात वेतन फरकाचे बिल add करून काढले असल्यास बिल कसे काढले होते , त्यानुसार बदल करा. म्हणजे बिलात basic arrears या tab मधून काढले होते की , broken period चा वापर केला होता, ते पहा. |
 |
DCPS कर्मचारी यांची नियमित dcps कपात व delayed ची कपात यांच्या नोंदी शाळास्तरावर ठेवलेल्या रजिस्टर नुसार चेक करा. dcps delayed च्या नोंदी कशा करायच्या याची माहिती येथे दिली आहे. -पहा |
 |
शिक्षणसेवक कालावधी संपून कर्मचारी नियमित सेवेत केव्हापासून येतो, याच्या नोंदी ठेवा. नियमित सेवेच्या नोंदी शालार्थ मध्ये कशा करायच्या त्याची माहिती येथे आहे. |
 |
कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी शेवटचे ३ महिने त्याचे भविष्य निर्वाह निधी वर्गणी बंद करतो. याची नोंद करण्यासाठी deduction या tab वरून GPF GRP ABC/D चेक बॉक्स deactivate करा. |
 |
कालबद्ध पदोनत्ती, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, इ. मुळे वेतनातील बदल असल्यास change details या tab वरून दुरुस्ती करा , forward करा. व वेतन पथकाकडून त्याची मंजुरी घ्या. बदल कसे करावे माहिती येथे आहे. |
|
आता वरील सर्व बदल झाले असतील तर बिलातील कपातीच्या रकमा टाकण्यासाठी worklist >payroll>employee informaton> non government या tab ला क्लिक करा. येथे देयकाचा महिना वर्ष बिल ग्रुप निवडल्यावर खालीलप्रमाणे deduction head दिसू लागतील. यामध्ये ज्यामध्ये बदल करायचा आहे तो option निवडा . उदा.LIC, Society,RD, etc. option ला क्लिक केल्यावर मागील महिन्यातील भरलेल्या रकमा त्या कर्मचाऱ्यांच्या नावासमोर दिसू लागतील. येथे new entry या tab मध्ये चालू महिन्याच्या रकमा टाकून page सेव्ह करा. अशा प्रकारे बिलामध्ये करावयाच्या सर्व नोंदी झाल्या असतील तर बिल जनरेट करण्यासाठी worklist >payroll>view /generate bill या tab ला क्लिक करा. येथे चालू महिना वर्ष - बिल ग्रुप व बिल suplimentary की regular निवडून generate bill या tab ला क्लिक करा. bill successfully generated असा मेसेज येईल. जनरेट झालेले बिल पाहण्यासाठी किंवा प्रिंट काढण्यासाठी reports या tab वर all reports या बटण ला क्लिक करा. पुन्हा महिना वर्ष - बिल ग्रुप निवडा ok ला क्लिक करा. report च्या सर्व प्रती दिसू लागतील. एक एक page ओपन करा. व प्रिंट करा.
वेतन देयकासोबत जोडावयाची प्रपत्रे व त्यांचा क्रम याची माहिती येथे दिली आहे. लिंक |
|
|