ठराविक कर्मचाऱ्यांचा वेतन फरक काढावयाचा असल्यास आपल्यास नवीन बील ग्रुप तयार करून किंवा अगोदरच एकापेक्षा अधिक बिल ग्रुप तयार असल्यास त्या बिल ग्रुपला नावे attach करून बील जनरेट करावे लागते. नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा याची माहिती येथे पाहूया.
PATH = worklist >payroll>organisation/office profile>bill group maintenance

यामध्ये आपल्या शाळेच्या या अगोदरच बिल ग्रुप तयार असतील तर सुरुवातीलाच bill group ID व discriptions या बॉक्स मध्ये ते पाहता येतील. त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास bill group ID वर क्लिक करा त्याचे details ओपन होतील.
नवीन बिल ग्रुप बनवताना scheme name या ठिकाणी माध्यमिक शाळांसाठी GIA to ordinary secondary school व उच्च माध्यमिक साठी GIA to non goverment jr.college हे name select करा. scheme code व bill group id हे आपसूकच येतील. येथे description हा बॉक्स महत्वाचा आहे. येथे अगोदर दिसणारी अक्षरे drag करून काढून टाका. व आपल्या शाळेचे नाव टाईप करा. व त्यापुढे bill group-1 किंवा bill group-2 असे टाईप करा. उदा. smhighschool_billgroup-1
हे अशा प्रकारे नावे देण्याचा फायदा असा होतो की नियमित बिलांसाठी आपण billgroup-1 चा वापर करू. व फरकाची बिले करत असताना कोणता bill group वापरला होता हे लक्षात ठेवणे सोपे होते. तसेच एखादा bill group imergency साठी राखूनही ठेवता येतो.
एक महत्वाचे लक्षात असू दया की प्रत्येक शाळेला जास्तीत जास्त तीनच billgroup बनवता येतात. आणि एका महिन्यात एक billgroup एकदाच जनरेट होतो. म्हणजे एका बिल ग्रुप वरून एका महिन्यात एकाच बील बनवता येते. ते बील वेतन पथकाकडून approved झाल्याशिवाय तो billgroup क्लीअर होत नाही, एंगेज राहतो. नियमित वेतन देयक एकाच बील ग्रुप काढा अशा स्पष्ट सूचना वेतन पथकाकडून देण्यात आल्या आहेत.
वरील चित्रात दिसत असल्या प्रमाणे type of post च्या ठिकाणी both ला सिलेक्ट करा. व group च्या ठिकाणी NA सोडून इतर सर्व options ना टिक करा. येथे group च्या ठिकाणी employee cadres चे हेड आहेत. उदा. शिपाई संवर्ग हा D कॅडर मध्ये येतो.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |