PATH = WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE INFORMATION > NON COMPUTATIONAL DUES AND DEDUCTIONS
या पाथने जाण्यापूर्वी employee eligibility for allowances and deductions येथे जाऊन allowances या हेड खाली DA/TA Arrears tabs activates आहेत की नाहीत याची खात्री करा, नसतील तर activate करून घ्या. नंतरच वरील पाथने प्रवेश करा.
येथे प्रथम एक सर्च विंडो येते. ठराविक कर्मचाऱ्यांचाच फरक काढायचा असल्यास कर्मचाऱ्याचे नाव टाकून सर्च करा. नाहीतर येथे काही टाकायची गरज नाही. पुढील विंडो मधील माहिती भरायला लागा.

येथे type of component मध्ये allowances निवडा. pay item मध्ये महागाई भत्ता फरक काढावयाचा असल्यास DA Arrears व वाहन भत्ता फरक असेल तर TA Arrears निवडा. बील ग्रुप निवडा. कर्मचाऱ्यांची नावे दिसू लागतील. खाली कर्मचाऱ्यांच्या नावाच्या समोर new amount मध्ये manually calculation करून मिळालेली फरकाची रक्कम टाका. सर्व माहिती भरल्यावर सेव्ह करा. बील जनरेट केल्यावर inner - outer पेजवर याच्या नोंदी पाहायला मिळतील.
ठराविक दिवसांचा वाहन भत्ता काढावयाचा असल्यास याच पद्धतीने काढता येईल. तो काढताना प्रथम eligibility for allowances and deduction tab वरून नियमित वाहन भत्ता tab deactivate करायचा. व त्या ऐवजी transport allowance arrears tab activate करून घ्यायचा. त्यानंतर वरील प्रमाणे ठराविक दिवसांचा वाहन भत्ता new amount मध्ये टाकून बील जनरेट करायचे.म्हणजे नियमित वाहन भत्त्याच्या ठिकाणी 0 (zero) रक्कम येईल.व arrears च्या ठिकाणी टाकलेली रक्कम येईल.
आपण या विभागात आहात :- वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे > महागाई भत्ता / वाहन भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |