शालार्थ साईटवर लॉगीन केल्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यात change password चा tab मिळतो.

पासवर्ड दर महिन्याला बदलणे अत्यावश्यक आहे. न बदलल्यास तो सिस्टीम लॉक होतो. म्हणजे शालार्थ साईट वर शाळेच्या युजर आयडी ने लॉगीन करता येत नाही. तो रिसेट करून घेण्यासाठी कंपनीकडे मेल करावा लागतो. त्यासाठी शाळेच्या लेटर प्याड वर पत्र लिहून प्रमाणित करून ते स्कॅन करून घ्या व shalarth@gmail.com या इ -मेल आईडी ला मेल करा. पत्रामध्ये शाळेचे नाव, पत्ता, मुख्याध्यापकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, शालार्थ आईडी नंबर प्रामुख्याने नमूद करा.
पासवर्ड रिसेट झाल्यावर मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर तसा मेसेज येईल. व नवीन पासवर्ड मिळेल. हा मिळालेला नवीन पासवर्ड चा वापर करून जेव्हा पहिल्यांदा लॉगीन कराल, तेव्हा हा पासवर्ड चेंज करा. व दरमहिन्याला पासवर्ड बदलायला विसरू नका. तसेच पासवर्ड बदलताना मागील तीन पासवर्ड एकसमान नसतील याची खात्री करा. तसे झालेच तर पुन्हा सिस्टीम लॉक होईल.
पासवर्ड चेंज करण्यासाठी chenge password key वर क्लिक केल्यावर खालील विंडो ओपन होईल. पासवर्ड कसा असावा याची माहिती येथे पहावयास मिळेल.

यामध्ये जुना पासवर्ड - नवीन पासवर्ड व पुन्हा खात्री करण्यासाठी नवीन पासवर्ड ची एन्ट्री करा. पुढे सेव्ह बटनला क्लिक करा. Logout करा व पुन्हा नवीन पासवर्ड ने लॉगीन करून खात्री करा.
पासवर्ड विसरला असाल किंवा हरवला असेल तर काय कराल ?
शालार्थ साईट वर लॉगीन बॉक्स च्या खाली forget password ची लिंक उपलब्ध आहे. येथे क्लिक केल्यास level -DDO-1 सिलेक्ट करा. शाळेचा शालार्थ आईडी टाका. व reset password बटनला क्लिक करा. पासवर्ड रिसेट झाल्याचा मेसेज मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर त्वरित येतो. त्यामधील पासवर्ड ने लॉगीन करून पहिल्या वेळेस पासवर्ड वर सांगितल्याप्रमाणे चेंज करून घ्या.
पासवर्ड लक्षात राहण्यासाठी काही ट्रिक्स सांगतो. पासवर्ड असा तयार करा की ज्याच्यामध्ये महिना वर्ष नमूद असेल. उदा.शाळेचे नाव स.पा.विद्यालय असेल व महिना मे २०१७ असेल तर पासवर्ड =Spv@may2017, Sp@052017, May@2017
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |