नवीन अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांची नियमित महिन्याची वर्गणी कपात सिस्टीम मधून बील जनरेट केल्यावर आपसूकच होते, त्यासाठी फक्त employee eligibility for allowances and deductions या tab मध्ये deductions हेड खाली dcps संबंधित ऑप्शन activate असले पाहिजेत. मात्र मागील महिन्याची वर्गणी वसुली रक्कम dcps delay या tab मधून टाकावी लागते. त्यासाठी dcps रजिस्टर ही माहिती भरताना समोर ठेवा.
PATH = worklist >dcps>dcps contribution>online contribution entry

प्रथम बील ग्रुप निवडा. pay month and year च्या ठिकाणी चालू महिना ज्या महिन्याचे बील काढायचे आहे तो महिना व वर्ष निवडा. payment type येथे Delayed सिलेक्ट करा. Delay month व year येथे मागील वसुलीचा महिना व वर्ष निवडा. त्यापुढे Go बटण वर क्लिक करा.

वर दिसत असल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची नावे दिसू लागतील. नावासमोर contribution start date व end date येथे वर सिलेक्ट केलेला महिना दिसू लागेल. येथे basic , da, contribution या entry manually टाकाव्या लागतात. बहुतेक वेळा या चुकीच्या येतात. त्यासाठी dcps रजिस्टर वरून नोंदी पडताळणी करून घ्या. व नंतरच save करा. चुकीने जरी या नोंदी सेव्ह झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतात. यासाठी delete row हा ऑप्शन ठेवला आहे.
आता dcps कर्मचाऱ्यांचा मागील महिन्याचा महागाई भत्ता फरक कसा नोंदवायचा ते पाहू .
यासाठी वरील प्रमाणेच online contribution entry या रूठ ला या. येथे पुन्हा pay month and year चालू महिना ज्या महिन्याचे बील काढायचे आहे तो महिना व वर्ष सिलेक्ट करा. payment type च्या ठिकाणी da arrears निवडा. Go बटनला क्लिक करा.

da arrears start date and end date येथे फरक कोणत्या कालावधीचा तो निवडा. फरक कालावधी सर्वांचा सारखाच असेल तर set da arrears dates for all या बटनला क्लिक करा. खाली कर्मचाऱ्यांची नावे दिसू लागतील. येथे फरक कालावधीतील एकूण महागाई फरकाची रक्कम व dcps साठी वर्गणीतील फरक याची नोंद da व contribution या दोन बॉक्स मध्ये करायची आहे. भरलेली माहिती सेव्ह करा. बील जनरेट करून पहा योग्य बदल झालेले आहेत की नाहीत.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |