शालार्थ प्रणाली मध्ये बहुतांशी दुरुस्त्या या वेतन पथक स्तरावरच होतात. परंतु काही वेळा शाळास्तरावरून वेतन पथकाकडे दुरुस्त्यांसाठी फॉरवर्ड केलेल्या फॉर्ममध्ये तांत्रिक कारणास्तव बदल करता येत नाहीत. मग अशा प्रकारच्या दुरुस्त्यांसाठी report issue हा tab उपयोगी पडतो. या tab चा वापर करून आपण थेट शालार्थ शी संबंधित सिस्टीम ऑपरेटरशी मेल द्वारे संपर्क साधतो. पाठविलेल्या मेलला केस नंबर मिळतो व त्यानंतर केसची privority ठरविली जाते. त्यानुसार समस्या सोडविली जाते. रिपोर्ट बॉक्स मध्ये status remarks मध्ये consolved हा remark असेल तर आपला problem solve झाला आहे असे समजावे.
report issue मधून कंपनीकडे मेल कसा करायचा ते पाहूया.
PATH = WORKLIST > PAYROLL > REPORT ISSUE
येथे गेल्यावर Add New Ticket चा बॉक्स येईल. त्याला क्लिक करा. पुढील विंडो ओपन होईल.

येथे मी मुद्दाम भरलेला फॉर्म ठेवला आहे. माझ्या शाळेचा असा प्रोब्लेम होता की बील जनरेट केल्यावर नवीन add केलेले कर्मचारी दिसत नव्हते. त्यासाठी मी वरील फॉर्म मध्ये title च्या ठिकाणी समस्येचा विषय टाकला. sceen name येथे dropdown list मध्ये शालार्थ मध्ये उपलब्ध सर्व प्रकारच्या tab ची नावे आहेत. त्यापैकी आपला problem कुठे आहे, त्याचे नाव सिलेक्ट करा. Discription मध्ये आपली समस्या सविस्तर लिहा. त्यापुढे user name and password येथे शालार्थ आईडी व पासवर्ड लिहा. त्यापुढे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर व शाळेचा इमेल लिहा. History -your inputs या ठिकाणी काहीही लिहायची आवश्यकता नाही. submit entry बटनला क्लिक करा.
आपण या विभागात आहात :- वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे > report issue या tab विषयी माहिती.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |