सर्वसाधारणपणे भविष्य निर्वाह निधी वर्गणी मध्ये बदल किंवा वाढ ही मार्च च्या वेतन देयकातून करतो. वर्गणीमध्ये बदल करण्यासाठी खालील पाथने जा.
PATH = WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE INFORMATION > NON COMPUTATIONAL DUES AND DEDUCTIONS

येथे type of component मध्ये deductions निवडा. pay item मध्ये GPF_GRP_ABC (ABC कॅडरशी संबंधित कर्मचारी ) किंवा GPF_GRP_D (चतुर्थश्रेणी कर्मचारी ) यापैकी योग्य तो ग्रुप निवडा.म्हणजे त्या ग्रुप मधील कर्मचाऱ्यांची माहिती भारता येईल. पुढे नियमित वेतनाचा बील ग्रुप निवडा. कर्मचाऱ्यांची नावे दिसू लागतील. खाली कर्मचाऱ्यांच्या नावाच्या समोर अगोदरची भविष्य निर्वाह निधी वर्गणी existing amount या कॉलम मध्ये दिसत असेल. त्यापुढे new amount हेड खाली बदलावयाची रक्कम टाका. सर्व माहिती भरल्यावर सेव्ह करा. बील जनरेट केल्यावर pf statements मध्ये याच्या नोंदी पाहायला मिळतील.
आपण या विभागात आहात :- वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे > भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |