सर्वसाधारणपणे ठराविक दिवसांचा पगार काढावयाचा असल्यास broken period या tab मधून बिले काढली जातात. त्वरित सेवासमाप्ती , आकस्मिक आजार , मृत्यू , निलंबन , अतिरिक्त कर्मचारी / बदली कारणाने कार्यामुक्ती , प्रसूती रजा , नवीन नियुक्तीस उशिराने मान्यता, ई . परिस्थितीत आपल्याला कर्मचा-याचा ठराविक दिवसांचा पगार काढावा लागतो . यामध्ये सर्व entries या manually कराव्या लागतात. म्हणजेच यामध्ये कोठेही Auto Generate Formula किंवा Links नसतात .
संबंधित कर्मचाऱ्याचे seperate बील काढावयाचे असल्यास त्याला वेगळ्या बिल ग्रुप ला attach करा. नियमित देयकातून काढावयाचा असल्यास त्याची आवश्यकता नाही.
Path : Worklist > Payroll > Employee Information > Broken Period
वरील पाथ ने गेल्यावर search window Open होईल .
यामध्ये कर्माचा–याचे नाव ..... वर्ष .... महिना .... हि माहिती टाकून Search करा . खालील प्रमाणे window दिसेल .

यामध्ये प्रथम किती तारीख पासून केव्हापर्यंत ते कामावर उपस्थित होते ती तारीख from date - to date रकान्यात टाका . no. of days आपसूक येते . पुढचा रकान्यात उपस्थित असलेल्या दिवसांचा पगार manually calculate करून टाकायचा आहे . त्या पुढे मूळ पगार व ग्रेड पे यांची बेरीज करून टाका . DA. HRA. TA. च्या रकमा टाका . याची बेरीज Gross Amount मध्ये मिळते . त्यापुढे भनिनी व व्यवसाय कराच्या रकमा टाका . हाती मिळणारी रक्कम आपसूक येते . पुढच्या रकान्यात योग्य ते कारण निवडा योग्य कारण उपलब्ध नसेल तर other निवडून त्यापुढील Remarks रकान्यात टाईप करून लिहू शकता . हे झाल्यावर save करा . व बील जनरेट करून आपण भरलेली माहिती आपल्याला हवी तशी मिळते कि नाही ते पहा . बील जनरेट करताना योग्य तो महिना वर्ष, बील ग्रुप निवडल्यास चुका होणार नाहीत .
आणि एक महत्वाचे – कर्मचारी बील वेगळ्या बील ग्रुप वरून काढले असेल तर या महिन्याचे बील मंजूर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्याचे बील करायला घ्याल तेव्हा या कर्मचाऱ्याला पुन्हा नियमित वेतन बील ग्रुप मध्ये घ्यायला विसरू नका .
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |