काही वेळा एखाद्या कर्मचाऱ्याचे नाव बिलातून वगळून बील काढावयास सांगितले जाते. अशा वेळी नियमित वेतनाच्या बील ग्रुप वरून तो कर्मचारी dettach करून ठेवावा लागतो. व नंतर काही कालावधीनंतर पुन्हा त्याचे वेतन काढावयास सांगितले जाते. अशा वेळी कशा प्रकारे त्याचे वेतन काढायचे याची माहिती येथे देत आहे.
Path : Worklist > Payroll > Organization/Office Profile > Attach Employee to Bill Group

नियमित देयकातून कर्मचाऱ्याचे नाव वगळण्यासाठी ही कृती करा. येथे bill group च्या ठिकाणी नियमित वेतनाचा बील ग्रुप निवडा. type of attach detach मध्ये attach dettach employee हा option निवडा. Go ला क्लिक करा. नियमित देयकामध्ये असलेले सर्व कर्मचारी उजव्या बाजूला दिसू लागतील. आता नको असलेला कर्मचाऱ्याच्या नावासमोर चेक बॉक्स ला टिक करा. व मध्ये दिसत असलेल्या dittach बटण ला क्लिक करा. तो कर्मचारी डाव्या बाजूला दिसू लागेल. सेव्ह करा. आता तो कर्मचारी नियमित देयकातून बाहेर आहे व इतर कोणत्याही बील ग्रुपला जोडलेला नाही आहे. या स्थितीत बील जनरेट केल्यास कर्मचारी वगळलेले बील तयार होईल.
वगळलेल्या कर्मचाऱ्याचे seperate बील काढावयास सांगितल्यास वर सांगितल्याप्रमाणे path ने या पायरीवर या. येथे आता bill group च्या ठिकाणी नियमित बील ग्रुप सोडून दुसरा ग्रुप निवडा. पुढे attach /dettach employee हा ऑप्शन निवडा. Go वर क्लिक केल्यावर तो कर्मचारी डाव्या बाजूला दिसू लागेत. त्याच्या नावासमोर चेकबॉक्स ला select करून Attach बटण ला क्लिक करा. आता तो उजव्या बाजूला आला असेल. खाली सेव्ह बटनला क्लिक करा. त्यानंतर त्याच्या देयकातील deduction च्या रकमा दुरुस्ती करताना प्रत्येक वेळी हाच बिल ग्रुप निवडायला विसरू नका. तसेच बील जनरेट करताना हा नवीन बिल ग्रुप चं निवडा व बील जनरेट करा.
बील मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्याचे बील करताना पुन्हा नियमित देयाकाला नाव attach करावयास सांगितल्यास पुन्हा वरीलप्रमाणे कृती करावी.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |